शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधित वाघिवलीचे स्थलांतर न करण्याचा निर्णय; सिडकोची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:31 IST

ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांचा फटका

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांत वाघिवली गावाचाही समावेश आहे. हे गाव विमानतळ गाभा क्षेत्रात येत नसले तरी गाभा क्षेत्राला लागूनच आहे. वाघिवली हे दहा गावांपैकी एक असल्याने स्थलांतरानंतर पुनर्वसनाचे सर्व फायदे येथील ग्रामस्थांना लागू होणार आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांमुळे या गावाचे स्थलांतर न करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. तसे झाल्यास येथील ग्रामस्थांना पुनर्वसन पॅकेजच्या लाभापासून वंचित राहवे लागणार आहे.वाघिवली गावातील १५६ कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास ९० कुटुंबांनी सिडकोने पुन:स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर केले आहे. मात्र, अद्यापही सुमारे ६५ कुटुंबांनी सिडकोने दिलेल्या मुदतीत स्थलांतर केलेले नाही. या कुटुंबांनी पुनर्वसन व पुन:स्थापन पॅकेज व्यतिरिक्त विविध अटी-शर्ती व मागण्या सिडकोसमोर ठेवलेल्या आहेत. सर्व प्रकल्पबाधितांसाठी पुनर्वसन पॅकेज समान राहणार असल्याने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सिडको व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.स्थलांतरित जागेत घराचे बांधकाम करण्यासाठी सिडकोने निश्चित केलेल्या १५०० रुपये प्रति चौ. फूट दराऐवजी अडीच हजार रुपये दर मिळावा, या सारख्या अनेक वाढीव मागण्या वाघिवली ग्रामस्थांकडून सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. या ग्रामस्थांच्या वाढीव मागण्या मान्य करण्याचा कोणताच प्रश्न येत नाही. शिवाय, सदर गावाचे स्थलांतर नाही झाले तरी विमानतळ प्रकल्पात त्याचा कोणताही अडथळा येणार नसल्याची भूमिका सिडकोने घेतली आहे.वारंवार विनंती करूनही वाघिवली गावातील उर्वरित कुटुंबे स्थलांतर न करण्याच्या भूमिकेवर अडून असल्याने अखेर या गावाचे स्थलांतर न करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. असे असले तरी वाघिवलीच्या प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंतची एक अखेरची संधी देण्याचा निर्णयही सिडको व्यवस्थापनाने घेतल्याचे समजते.

टॅग्स :cidcoसिडको