कल्याण : कल्याण स्पोर्ट्स क्लब प्रकल्पाच्या वाद प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल याचिकेवर 28 ऑक्टोबरला निर्णय होणार आह़े या बहुचर्चित प्रकरणाचा काय निर्णय लागतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
कल्याण स्पोर्ट्स क्लबच्या कंत्रटदाराला अटीशर्तीचा भंग केल्याबद्दल करारनामा रद्द करण्याची नोटीस केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी बजावली आहे. यात बहुउद्देशीय सभागृह बांधण्याऐवजी बेकायदेशीररीत्या मॅरेज सभागृह बांधणो, बांधकामात फेरबदल करणो, प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणो, एस्क्रो अकाउंट न उघडणो, प्रीमिअम न भरणो, असा ठपका ठेवला आहे. यावर संबंधित प्रकल्पाचे कंत्रटदार डॉ़ दिलीप गुडका यांनी केडीएमसीनेच अटीशर्तीचा भंग केल्याचा आरोप केला आहे. अडीच वर्षापूर्वी केडीएमसीने मॅरेज सभागृहाला सील ठोकले. यासंदर्भात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले असताना पालिकेने बजावलेली नोटीस न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचा आरोप गुडका यांनी केला. या प्रकल्पासाठी 58 हजार 2क्क् चौमी जागा देण्याचे ठरले होत़े परंतु, आजतागायत केवळ 32 हजार चौमी जागाच ताब्यात देण्यात आली आहे. केडीएमसीने दिलेल्या परवानगीनुसारच बांधकाम केलेले आहे, मग ते बेकायदेशीर कसे, असा सवाल त्यांनी केला आहे.
जलतरण तलावाला अद्याप पाणी कनेक्शन देण्यात आलेले नाही़ पालिकेच्या छळवादी धोरणामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास अडथळा निर्माण झाला असून बजावलेल्या नोटीसची कारणो दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. याप्रकरणी दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालय 28 ऑक्टोबर रोजी निर्णय देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)