शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 04:27 IST

पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पनवेल : पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे या निश्चित वेळेतच पालिकेतील अधिकाºयांना भेटता येणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.विविध विभागातील अधिकाºयांना कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण करण्याबरोबर कार्यालयीन बाहेरील कामांची देखील पाहणी करण्याची जबाबदारी अधिकाºयांवर असते. अशा वेळेत कार्यालयात अधिकाºयांना भेटण्यासाठी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होते. तासनतास वाट पाहून देखील अधिकाºयांची भेट होत नसल्याने पालिकेत येणाºया नागरिकांचा हिरमोड होत असतो. याकरिता पालिकेने वेळा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, नगररचना संचालक अ. अ. शेख, शहर अभियंता सुधीर कटेकर यांच्यासह मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांना दररोज दुपारी अडीच ते साडेतीन या एक तासात भेटता येणार आहे. तर दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना भेटण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सुरुवातीपासूनच वेळ ठरविलेली आहे. आता आयुक्तांना भेटण्यासाठी नवी वेळ ठरविण्यात आली असून सोमवार व गुरुवार याच दिवशी सायंकाळी ४ ते ५ या एक तासांत भेट घेता येणार आहे.

टॅग्स :panvelपनवेल