शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर-बाबरी मशिदीचा निर्णय घ्या

By admin | Updated: March 27, 2017 06:41 IST

राम मंदिर व बाबरी मशिदीचा वाद न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी राम मंदिर-बाबरी

मुंबई : राम मंदिर व बाबरी मशिदीचा वाद न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी राम मंदिर-बाबरी मशीद कृती समितीने दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्र सरकारने हस्तक्षेप करत अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद दोन्हीही उभारून वाद मिटवावा. अन्यथा या ठिकाणी राम रहीम रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारून वादावर कायमस्वरूपी पडदा टाकण्याची विनंती कृती समितीने केली आहे.समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीची भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे देशभर दंगली होत असून दोन्ही धर्मांत तेढ निर्माण झाली आहे. काही राजकीय व्यक्तींनी या वादाचा फायदा घेत वाद मिटवण्याऐवजी तो धुमसता ठेवण्यातच धन्यता मानली आहे. अराजकीय व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कृती समितीमार्फत २९ मार्चला दिल्ली येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत हिंदू व मुस्लीम धर्मातील प्रमुख व्यक्तींसह, माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकील, कायदेशीर सल्ला देणाऱ्या नामांकित व्यक्ती आणि प्रमुख राजकीय व्यक्तींना आमंत्रित केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत तोडगा निघाला नाही, तर केंद्र सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करून संबंधित जागेवर रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारून हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)