शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१५ डिसेंबरपासून दंडाच्या रकमेवर मिळणार ७५ टक्के सूट; पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:19 IST

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना

नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २0२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना त्यांच्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट दिली जाणार आहे.कोविडकाळात सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्ताधारकांना ही योजना दिलासा देणारी असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. कररूपाने जमा होणाऱ्या निधीतून महापालिका विविध सुविधांची पूर्तता करते. परंतु कोविडमुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरपासून या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराची थकीत रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेत त्यांना ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. दरम्यान, या अभय योजनेस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मालमत्ता कराची थकीत रक्कम व ७५ टक्के सवलत वगळून उर्वरित २५ टक्के दंडात्मक रक्कम एकाच वेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेस अभय योजना लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.ऑनलाइन सुविधायोजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच सर्व ८ विभाग कार्यालये आणि कर भरणा केंद्रांवर उपलब्ध करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका