शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खेळाच्या मैदानात डेब्रिजचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:19 IST

कोपरखैरणेतला प्रकार; संबंधितांवर कारवाईत पालिकेची चालढकल

नवी मुंबई : खेळाच्या मैदानात डेब्रिजचा भराव टाकल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे. गणेशोत्सवादरम्यान मैदानात चिखल होऊ नये याकरिता हा प्रकार करण्यात आला होता. मात्र खेळाच्या मैदानामध्ये रेती, खडी अथवा डेब्रिज टाकण्याची बंदी असतानाही त्या ठिकाणी झालेल्या प्रकाराकडे पालिकेची डोळेझाक होताना दिसत आहे.पालिकेच्या वतीने शहरात प्रत्येक नोडनिहाय खेळाची मैदाने राखीव ठेवण्यात आली आहेत. त्या ठिकाणी परिसरातील मुले खेळत असल्याने त्यांना दुखापत होऊ नये, या उद्देशाने मैदानात डेब्रिज, खडी अथवा वाळू टाकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर खेळाची मैदाने सण, उत्सव किंवा सभांना भाड्याने देताना संबंधितांना तशी सूचनादेखील केली जाते. मात्र यानंतरही कोपरखैरणे सेक्टर ४ ते ८ च्या मध्यभागी असलेल्या मैदानात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव टाकण्यात आलेला आहे. परिणामी सध्या या मैदानातून चालणे देखील कठीण झाले आहे. तर परिसरातील मुलांच्या खेळाचीदेखील गैरसोय झाली आहे. तर मैदानात टाकलेल्या भरावाचा फायदा त्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी घेतला जाऊ लागला आहे.कोपरखैरणे सेक्टर ४ ते ८ च्या दरम्यानचे एकमेव मोठे मैदान असून ते खेळांसाठी तसेच उत्सव साजरे करण्यासाठी देखील वापरले जाते. अशात मैदानात टाकण्यात आलेला डेब्रिजचा भराव नियमबाह्य आहे. पालिका अधिकारी कारवाईकडे दुर्लक्ष करून मैदानातील खेळ व नवरात्रौत्सव आयोजनात जाणीवपूर्वक बाधा निर्माण करत आहेत.- रॉबिन मढवी, सामाजिक कार्यकर्ते