शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 6, 2015 01:30 IST

मुंब्रा बायपास येथून ठाण्याच्या दिशेने भन्नाट वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कचऱ्याच्या टेम्पोला मागून धडक दिली. त्याच वेळी या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून एका मोटारसायकलवरील जीवन

ठाणे / मुंब्रा : मुंब्रा बायपास येथून ठाण्याच्या दिशेने भन्नाट वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कचऱ्याच्या टेम्पोला मागून धडक दिली. त्याच वेळी या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून एका मोटारसायकलवरील जीवन जगत कारकी (२८) आणि मदन सखाराम भगत (३८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा मोटारसायकलस्वार हिरा वारणीकर हा जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रकचालक मात्र पसार झाला आहे.हा विचित्र अपघात मुंब्य्रातील रेतीबंदर भागात बुधवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास घडला. खारेगाव टोलनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकवरील चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने त्याने कचऱ्याच्या टेम्पोला वाचविताना टेम्पोसह दोन मोटारसायकली आणि एका कारलाही जोरदार धडक दिली. यात टेम्पोचालक चंद्रकांत नामदेव पाठारे (२८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध अपघातास आणि दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)