शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: January 9, 2016 02:24 IST

एनएच-४ बी, एमएच- ५४ या महामार्गावरील अपघाताचे लोण आता उरण पूर्व भागात येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भरधाव कंटेनर ट्रेलरने चिरनेर येथील

उरण : एनएच-४ बी, एमएच- ५४ या महामार्गावरील अपघाताचे लोण आता उरण पूर्व भागात येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी भरधाव कंटेनर ट्रेलरने चिरनेर येथील एका तरुणाला चिरडले. अपघातात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. जितेंद्र भरत काळण (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो स्कुटीवरून कामाला निघाला असताना विंधणे येथे ट्रेलरने त्याला धडक दिली. त्यात कंटेनर ट्रेलरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.जितेंद्र काळण हा नुकताच एका खासगी बँकेमध्ये नोकरीला लागला होता. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो कामाला निघाला असतानाच गव्हाणफाट्याकडून चिरनेरकडे येणारा ट्रेलर (आरजे-०९जीए-८१११) या ट्रकने त्याच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत जितेंद्र स्कूटरसह खाली पडला, त्या वेळेस ट्रेलरचे पाठीमागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरची वाहतूक रोखून धरली होती. अखेर आमदार मनोहर भोईर यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढून यापुढे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. ग्रामस्थांचा संताप पाहून एसीपी शेषराव सूर्यवंशी, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)