शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशी गावात डे नाईट क्रिकेट स्पर्धा, पतंग महोत्सवाला सुरुवात

By admin | Updated: January 14, 2017 07:06 IST

लोकमत माध्यम प्रायोजक आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आणि पतंग

नवी मुंबई : लोकमत माध्यम प्रायोजक आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आणि पतंग महोत्सवाचा गुरुवारी शुभारंभ झाला. वाशी गावातील शिवतीर्थ मैदानात करसन भगत स्मृती चषक २०१७ सुरुवात झाली आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात संध्याकाळी ६ ते रात्री १० यावेळेत क्रिकेटचे सामने होणार आहेत.नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत आणि ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशात रंगीबेरंगी फुगे उडवून याठिकाणी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार माणिकराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. याठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पुरस्कारांचा समावेश आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत, लोकमत मुंबई विभागाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.