शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

दप्तराचे ‘ओझे’ मुख्याध्यापकांच्या खांद्यावर

By admin | Updated: November 11, 2015 00:28 IST

विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलविद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुचवलेले उपाय ३0 नोव्हेंबरपर्यंत अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका झाली नाही तर मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही दिला. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. त्याबाबत रायगड जिल्ह्यातील ३८00 शाळांना माहिती देण्यात आली असून हा विषय गांभीर्याने घेण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.वेगवेगळे विषय, व्यवसाय, पुस्तके, वह्या, इतर साहित्याने विद्यार्थ्यांची बॅग गच्च भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठे ओझे लादल्यासारखे होते. त्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक दप्तराचे ओझे असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्याने शिक्षणाचा मूळ हेतूच बाजूला पडला, असे याचिकेत म्हटले होते. याबाबत न्यायालयाने शासनाकडे विचारणा केली. नेमके उपाय सुचवण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याने सादर केलेल्या अहवालावर २१ जुलै २0१५ रोजी शासनाने निर्णय घेतला. आवश्यक त्या तयारीसाठी शाळांना महिन्यांचा अवधी दिला. ही मुदत आता ३0 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या संपल्या, की विद्यार्थ्यांचे दप्तर आता थोडेसे हलके होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा शिक्षण विभागाकडे हे पत्रक आले आहे. त्यानुसार संबंधित शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा शिक्षण कार्यालयाकडून सांगण्यात आले.रायगड जिल्ह्यात २0३८ जिल्हा परिषद, ८५ नगरपालिका आणि ६00 खाजगी अशा ३८00 शाळा असून त्यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेवून अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार आहेत. जर दप्तराचे ओझे कमी झाले नाही तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- शेषराव बढे, जिल्हा शिक्षण अधिकारी, (प्राथमिक विभाग), रायगडसरकारी प्रकाशनांशिवाय इतर पुस्तकांचा अवलंब नको, व्यवसाय, परिसर, कार्यानुभव यांचा अतिरेक करू नये, शाळेतील अभ्यासाशिवाय घरचा अभ्यास मर्यादित ठेवा,उपक्र मांच्या नावाने स्वतंत्र वह्या अन्य पुस्तके ठेवू नये याबाबत विद्यार्थी-पालकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळेत स्वच्छ पाण्याची सोय करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सूचना देण्यात येणार आहेत. ज्यामुळे पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करता येणार आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही याची तपासणी करण्याकरिता भरारी पथक नेमण्यात येणार आहेत.