सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यात वृद्धांना अधिक धोका असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना वृद्धापकाळातले आजार कोरोनाची बाधा होण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ५१ ते ९० वयोगटांतल्या १३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार २६८ इतकी झाली आहे. एप्रिल मध्यांतरपर्यंत नियंत्रित असलेला शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा मागील दीड महिन्यात सर्वाधिक वाढला आहे. वेळेवर निदान न होऊ शकल्याने व उपचार न मिळाल्याने २१४ जणांचा मृत्यू झाला. त्यात वयोवृद्ध व्यक्तिंचा सर्वाधिक समावेश आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती तीव्र असण्याची गरज आहे. वयाची पन्नाशी ओलांडणाऱ्या अनेकांना कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले जाते. शिवाय पोषक आहाराकडेही दुर्लक्ष असते. त्यामुळे अगोदरच एखादं दुखणं असलेली वृद्ध व्यक्ती कोरोनाबाधितांच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्कात आल्यास त्यांनाही बाधा होत आहे. अशातच वेळीच त्याचे निदान न झाल्यास कोरोनासह अगोदरच असलेल्या इतर आजारांवर एकत्रित उपचार शक्य न होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर निघणाºया व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास, त्यांच्यापासून कुटुंबातील वयस्कर व्यक्तीला पटकन संसर्ग होऊ शकतो. यामुळे कुटुंबातही सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्यानंतरही विविध कारणांनी वयस्कर व्यक्ती कोरोनाबाधित होत आहेत, परंतु प्रकृतीने ठणठणीत असलेल्या अनेक वृद्धांनी कोरोनावर मात केलेली आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अशाच प्रकारातून ५१ ते ९० वयोगटांतील १ हजार ३५३ वृद्धांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यापैकी १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५१ ते ६० वयोगटांतील ६६ जणांचा, ६१ ते ७० वयोगटांतील ४५ जणांचा, ७१ ते ८० वयोगटांतील १७ जणांचा, तर ८१ ते ९० वयोगटांतील ७ जणांचा समावेश आहे. कोरोनाबाधित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण कोरोनाबाधितांच्या एक चतुर्थांश आहे. त्यापैकी बहुतांश वृद्धांना कुटुंबातील प्रौढ अथवा तरुण सदस्यापासून संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे.>१,२१८ जणांची कोरोनावर मातनवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरातील कोरोनाबाधितांमध्ये १,३९८ वृद्धांचा समावेश आहे,त्यापैकी १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उर्वरित १,२१८ वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. योग्यखबरदारी व उपचार घेतल्याने ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
CoronaVirus News : पोषक आहारातील कमतरता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:31 IST