शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील ३६ गावांना पुराचा धोका

By admin | Updated: June 29, 2015 05:15 IST

तालुक्यातील ३६ गावांना पुराचा धोका असल्याची शक्यता तहसील कार्यालयाने वर्तवली आहे.

पनवेल : तालुक्यातील ३६ गावांना पुराचा धोका असल्याची शक्यता तहसील कार्यालयाने वर्तवली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानेही वादळ, भूकंप, भूस्खलन, आग यापैकी पनवेलला पुराचा अधिक धोका असल्याचे आपल्या आराखड्यात नमूद केले आहे. पनवेल शहरातून कासाडी, गाढी, घोट, लेंढी, वाजापूर, पाताळगंगा, उसर्ली, किकरी आदी नद्या वाहतात. या नदीकिनारी अनेक गावे वसली आहेत. सलग दोन - चार दिवस मुसळधार पाऊस झाल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतात आणि हे पाणी पनवेल शहरात घुसते. त्यामुळे शहरातील सखल भागातही पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. २६ जुलै २00५ साली तालुक्यात अशाच प्रकारे महाप्रलय आला होता. शहराबरोबरच तळोजे मजकूर, घोटगाव, पोयंजे मंडळातील आपटे, गुळसुंदे, हरिग्राम धोदाणी ही गावे बाधित झाली होते. १७ जुलै २00९ रोजी वावंजे येथील १६ घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. तसेच आपटे गावामध्येही पातळगंगा नदीला पूर आल्याने मोठे नुकसान झाले होते.पूरग्रस्त क्षेत्रपालीदेवद, आसुडगाव, विचुंबे, काळुंद्रे, उसर्ली खुर्द, नौपाडा, पनवेल शहर (पटेल, कच्छी मोहल्ला, बावन बंगला, साईनगर, मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी), वडघर, करंजाडे, वाघिवली, कोळखे, पळस्पे, शिरवली, महोदर, चिंध्रन, धोदानी, चिपळे, केवाळे, हरिग्राम, वावेघर, गुळसुंदे, तुराडे, आपटे, कालीवली, कराडे खुर्द, पडघे, नावडे, कळंबोली वसाहत, तळोजा पाचनंद, घोटगाव.मागील वेळच्या पुराचा अनुभव व माहिती घेऊन विशेष खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून वेळोवेळी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ग्रामीण व शहरी भागात आपत्ती जोखीम समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल