शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चिपळे, शांतिवन पुलाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:25 IST

डांबर उखडले : खांब जीर्ण, लोखंड गंजल्याने नागरिकांच्या जिवास धोका

मयुर तांबडेपनवेल : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचा पत्रा खाली लोंबकळत आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेला आहे. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा परिषदेच्या शांतिवन पुलाच्या खालील बांधकामाचे लोखंड उघडे पडले असून ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. २००५ मध्ये झालेल्या महापुरामध्ये शांतिवन पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पुलाचे डागडुजी करण्यात आली होती. सध्या पुलाखालील सिमेंटचे काँक्रिटीकरण निखळत चालले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी पुलावरून पाणी वाहून गेले. यावेळी प्रवाहही वेगात असल्याने पुलावर काही ठिकाणी डांबर वाहून गेले. पुलावरून पाणी जाऊ लागल्याने वाहतूकही बंद करण्यात आली होती.धोकादायक बनलेल्या चिपळे पुलाच्या लोखंडी सळ्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तालुक्यात गाढी नदीवर १९७५ मध्ये पूल बांधण्यात आला आहे. पुलाचे आयुर्मान ५० वर्षे असून, पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. मात्र, सद्यस्थितीत पूल जीर्ण झाला असून, लोखंडी सळ्या पाण्यात लटकू लागल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे रेलिंगदेखील काही ठिकाणी तुटले आहे. शनिवारी, २७ जुलै रोजी पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी गेले असल्याने नागरिक भयभीत झाले होते.

चिपळे पुलाचे डागडुजीकरणाचे २३ लाखांचे काम अपूर्ण स्थितीत आहे. ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने लोखंडी सळ्या जैसे थे आहेत. पुलाची डागडुजी, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्यात आलेले नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई