शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जेएनपीटीने सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 02:53 IST

जेएनपीटी प्रकल्पबाधित महालण विभागातील ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदर प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी केली आहे.

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी प्रकल्पबाधित महालण विभागातील ग्रामपंचायतीचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदर प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी केली आहे.उरण तालुक्यातील जसखार, सोनारी, करळ, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, नवघर, पागोटे, धुतूम, चिर्ले, जासई आदी ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या आहेत; परंतु येथील गावठाण विस्ताराचा, नागरी समस्यांचा, रोजगाराचा, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत जेएनपीटी प्रशासनाने बंदर परिसर, जेएनपीटी वसाहतीमध्ये स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे अशा बंदरातील अधिकारी, कर्मचारी वर्गाचे ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पगस्त नागरिक आभार व्यक्त करीत आहेत; परंतु बंदर प्रशासनाने स्वच्छता अभियानातील गोळा करण्यात आलेला कचरा प्रकल्पगस्त बाधित ग्रामपंचायत परिसरात टाकल्याने त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.जेएनपीटी प्रकल्प बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी सिडको व जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने गेली २५ वर्षे पुढाकार न घेतल्याने या ग्रामपंचायत हद्दीतील केर कचरा टाकायचा कुठे? असा प्रश्न ग्रामपंचायतीना सतावत आहे. तरी जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने बंदर वसाहत जेएनपीटी बाधित ग्रामपंचायतींना नेहमीच सतावणारा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जसखार गावचे सरपंच दामूशेठ घरत यांनी लावून धरली आहे.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे भविष्यात येथील ग्रामपंचायत परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाढती रहदारी, अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत असून, याबाबतही वेळीच दखल घेण्याची मागणी घरत यांनी केली आहे.