शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कांद्यासह फळांचे नुकसान, भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरू

By नामदेव मोरे | Updated: November 28, 2023 17:59 IST

नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे.

नवी मुंबई : राज्यातील अवकाळी पावसाचा फटका कृषी मालालाही बसला आहे. कांद्याचे नुकसान झाले असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह इतर फळांचेही नुकसान झाले आहे. भाजीपाल्याची आवक मात्र अद्याप सुरळीत असून पावसाचा नक्की काय परिणाम झाला हे पुढील काही दिवसामध्ये स्पष्ट होईल.

नाशिकसह पुणे व इतर परिसरामध्ये झालेल्या पावसाचा कांदा पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईमधील आवक घटली आहे. मंगळवारी ६२३ टन आवक झाली आहे. गत आठवड्यात कांदा प्रतीकिलो २८ ते ३८ रुपये दराने विकला जात होता. आता हे दर ३० ते ४६ रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपयांवर गेला आहे. पुढील काही दिवस कांद्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा फळांवरही परिणाम झाला आहे. द्राक्ष, डाळींब, कलींगड, अंजीर, स्ट्रॉबेरीच्या फळांचे नुकसान झाले आहे. फळे खराब होण्याचे प्रमाण पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कांदा व फळांच्या तुलनेमध्ये भाजीपाला मार्केटमधील आवक सुरळीत सुरू आहे. मंगळवारी ४८६ वाहनांमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ९५ जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

नाशिक सह इतर ठिकाणी कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे मंगळवारी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.किशोर ठिगळे, व्यापारी

अवकाळी पावसाचा द्राक्ष, स्ट्रॉबेरी व इतर फळांना फटका बसला आहे. यामुळे फळे खराब होण्याची शक्यता आहे.संजय पानसरे, संचालक फळ मार्केट

भाजीपाला मार्केटमध्ये आवक सुरळीत सुरू आहे. अवकाळी पावसाचा अद्याप आवकवर खूप परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व इतर ठिकाणावरूनही आवक होत आहे.शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई