शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी पुन्हा वादाच्या भोव-यात अडकणार

By admin | Updated: July 31, 2014 01:38 IST

सुनावणी १८ आॅगस्टपूर्वी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. दहीहंडी उत्सवाबाबत नियमावली असावी, या आशयाचा अर्ज शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे केला आहे

स्नेहा मोरे, मुंबईबालगोविंदांसंदर्भात बालहक्क आयोग आपल्या निर्णयावर ठाम असताना दुसरीकडे दहीहंडी समन्वय समितीनेही बालगोविंदांना खेळवणारच, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात समन्वय समिती राज्य शासनाच्या मध्यस्थीची वाट पाहत असताना दुसरीकडे साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत शिंदे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाला साकडे घातले आहेत. याबाबतची सुनावणी १८ आॅगस्टपूर्वी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.दहीहंडी उत्सवाबाबत नियमावली असावी, या आशयाचा अर्ज शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे केला आहे. दहीहंडी उत्सवात सहा थरांनाच मान्यता द्यावी़ त्यापुढे थर रचण्यास बंदी घालावी. तसेच या उत्सवाच्या बाजारीकरणावर निर्बंध घालावे अशा मागण्या आयोगाकडे केल्या . शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवात २४६ गोविंदा जखमी झाले, तर ६६ गोविंदांची प्रकृती चिंताजनक होती. परंतु त्यांच्या परिस्थितीचा आढावा पुढील काळात घेतला जातो का, त्यांच्या भविष्याची देखभाल कोण करते, याच्या स्पष्टीकरणाची मागणीही त्यांनी केली आहे. याविषयीचा पहिला अर्ज त्यांनी २८ जानेवारी, २०१४ रोजी केला होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे तात्काळ अर्ज करीत १८ आॅगस्ट रोजी दहीहंडी उत्सवापूर्वी सुनावणी व्हावी, अशीही मागणी केली आहे. या उत्सवाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता द्यावी, या भूमिकेवर शिंदे यांनी प्रथम या खेळाचा सर्व बाजूंनी विचार करून त्यावर अभ्यास करून क्रीडा प्रकाराच्या मान्यतेचा विचार व्हावा, असेही सुचविले आहे.(प्रतिनिधी)