शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बँकेच्या लॉकरमधून उडवले ग्राहकांचे दागिने; संशयित सफाई कामगारावर गुन्हा दाखल 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 12, 2023 17:45 IST

एपीएमसीमधील प्रकार

नवी मुंबई : एपीएमसीमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकर मधून दोन ग्राहकांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. १० लाख ९० हजार रुपये किमतीचे हे दागिने आहेत. याप्रकरणी बँकेत सफाई काम करणाऱ्यावर संशय असल्याने त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एपीएमसी फळ मार्केट मधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेकडून वेळोवेळी लॉकरचे ऑडिट करून त्यामधील दागिन्यांची खातरजमा केली जाते. मार्च महिन्यात देखील असे ऑडिट झाले असता एका लॉकर मधील दोन ग्राहकांचे १० लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत. सदर ग्राहकांनी ते दागिने बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेतले होते. त्यानुसार हा लॉकर बँकेकडून ग्राहकांचे गहाण ठेवलेले दागिने ठेवण्यासाठी वापरले जात होते.

बँक अधिकारी व ग्राहक यांच्या व्यतिरिक्त बँकेत सफाई काम करणाऱ्याचे त्याठिकाणी येणे जाणे असायचे. शिवाय त्याने यापूर्वी ग्राहकांच्या एफडी पावत्या देखील चोरल्या होत्या. परंतु ग्राहकांनी आपसात प्रकरण मिटवल्याने बँकेने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. यामुळे त्यानेच लॉकरच्या चाव्या मिळवून त्यामधील दागिने चोरल्याचा संशय बँक अधिकाऱ्यांना आहे. याबाबत त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीNavi Mumbaiनवी मुंबई