शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गूळवेल ठरतेय आजारांत गुणकारी! मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:22 IST

जव्हार, मोखाडा भागांत गूळवेल सहज उपलब्ध होते. गूळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गूळवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना जव्हार, मोखाडासारख्या ग्रामीण भागांसह शहरातही गूळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. अनेक आजारांवर ही वेल ‘अमृतवेल’ ठरत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलेगूळवेलचा काढा सेवन केल्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, सांधेदुखी, आम्लपित्त, कावीळ, पोटदुखी, मधुमेह आटोक्यात येतो, असे सांगितले जात आहे. त्याप्रमाणे डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांवरही गूळवेल गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबांकडून त्याची मागणी होत आहे.

जव्हार, मोखाडा भागांत गूळवेल सहज उपलब्ध होते. गूळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी गूळवेलचा काढा घेण्यास पसंती दिली आहे. ग्रामीण भागात कडुनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गूळवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असते. कडुनिंबाच्या झाडावरील गूळवेलला मोठी मागणी आहे. या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तींनाच आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून अनेक कुटुंबे गूळवेल काढ्याचे सेवन करीत आहेत. काही जण या वेलीचे छोटे तुकडे करून रात्री पाण्यात भिजत ठेवतात. सकाळी उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करतात. तर, काही कुटुंबे या वेलीचे तुकडे पाण्यात टाकून ते पाणी उकळून पितात. गूळवेल हा एक रानभाजीचा प्रकारही मानला जातो. 

गूळवेलीचे फायदेप्रतिकारशक्ती वाढते. ताप कमी होतो. मलेरिया, टायफॉइड आजारांवर फायदेशीर असून पोटाच्या समस्या दूर होतात. मधुमेहावर गुणकारी असून दमा, खोकला आणि कफ कमी होतो. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. दरम्यान, तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ही गूळवेल घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

माझ्या घराच्या अंगणात गूळवेल उपलब्ध आहे. त्याचा फायदा आम्ही नेहमी घेतो. ही खूप गुणकारी वेल असून परिसरात नागरिक या वेली आमच्याकडून घेऊन जातात. याचा त्यांना खूप फायदा होतो.     - धम्मा लांडे, मोखाडा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई