शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा येथे पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:40 IST

अभयारण्याला पसंती; वर्षभरात ९८ हजार नागरिकांची भेट

- वैभव गायकर पनवेल : कर्नाळा अभयारण्य पर्यटकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. वर्षभरात सुमारे ९८ हजार १८५ पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. पर्यटनवाढीसाठी वनविभागाच्या वतीने सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत.पनवेलपासून सुमारे १२ किमी अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात रानसई चिंचवनच्या जंगलापर्यंत अभयारण्य पसरले आहे. या ठिकाणचा ऐतिहासिक कर्नाळा किल्ला शिवकाळातील आठवणींना उजाळा देतो. याव्यतिरिक्त जंगली प्राणी, विविध प्रजातीचे देशी-विदेशी पक्षी हे पर्यटकांना भुरळ घालत असतात. कर्नाळा अभयारण्यात एकूण १२५पेक्षा जास्त जातीचे पक्षी आढळतात. यात मलबार, व्हिसलिंग, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढºया पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवीआदी पक्षी आढळतात. यामध्ये मध्य आशिया, युरोप, सैबेरियातील स्थलांतरित पक्षीही येतात. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम परिस्थितीकीय विकास समिती स्थापन केली आहे. पर्यटनवाढीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण प्रयत्न करीत आहेत. फुलपाखरू उद्यान पर्यटकांना भुरळ घालत आहे.कर्नाळा अभयारण्यात विविध प्रजातीच्या पक्ष्यांची रेलचेल असते. मात्र सर्वांनाच सहजरीत्या हे पक्षी पाहावयास मिळत नाहीत.वेगवेगळ्या आकाराच्या पाच दुर्बीण पर्यटनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. दुर्बिणीच्या क्षमतेनुसार त्या पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.कर्नाळा अभयारण्याची ख्याती जगभरात पोहोचविण्यासाठी लवकरच वेबसाईट सुरू केली जाणार आहे. देशभरासह विदेशातील पर्यटकांना कर्नाळा अभयारण्याची माहिती सहज उपलब्ध व्हावी, तसेच आॅनलाईन बुकिंग करता यावे, यासाठी नवीन वर्षात वेबसाईट सुरूकेली जाणार आहे.- पी.पी. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य