शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लोकांची गर्दी, कोकण भवनमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:16 IST

Navi Mumbai : ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली होती अशा राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२०पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय कोकण भवन येथे असून कागदपत्रे सादर करण्यासाठी बुधवारी  उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता.ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली होती अशा राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार असून, १५ जानेवारी रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. निवडणूक अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा पावती आवश्यक असल्याने कागदपत्रे पडताळणीसाठी सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमध्ये इच्छुक उमेदवारांसोबत इतरही व्यक्ती आल्याने मोठी गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी मास्कचा वापर केला नव्हता. शैक्षणिक प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचीही गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी विभागाच्या माध्यमातून टोकन क्रमांक देऊन गर्दी न करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत होते. परंतु नागरिकांनी नियमाचे पालन न करता गर्दी केली होती.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांसोबत आलेल्या इतर व्यक्तींमुळे गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी टोकन प्रकिया राबविण्यात आली असून, विद्यार्थांसाठी वेगळी खिडकी सुरू केली आहे.- वासुदेव पाटील, उपआयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी, ठाणे जिल्हा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस