शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रादुर्भाव वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:08 IST

 नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

नवी मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु नेरुळमधील मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असून सुरक्षा नियमांचा विसर पडला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु शहरात सकाळी ११वाजेपर्यंत खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून मास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमांचा नागरिकांना विसर पडला आहे. नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात रस्ते आणि पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली असून अनेक फेरीवाले मास्कचा वापर न करता व्यवसाय करत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई