शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने वीटभट्टींचे कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 00:55 IST

पनवेल तालुक्यातील २५० व्यावसायिकांना फटका; भरपाई देण्याची मागणी

पनवेल : सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पनवेल तालुक्यातील वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कोटींच्या घरात असून, तब्बल २५० लहान मोठ्या वीटभट्टी व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे. शासनाने या संदर्भात नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टी व्यावसायिक करू लागले आहे.पावसाळा संपताच ऑक्टोबर महिन्यात वीटभट्टी व्यवसाय सुरू होतात. याकरिता लागणारे मजूर सोलापूर, कर्नाटक, वाडा आदी ठिकाणावरून आणले जातात. वीटभट्टी कारखाना असलेल्या जागेवरच या मजुरांची राहण्याची सोय केली जाते. व्यवसाय सुरू होण्यापूर्वी काही रक्कम आगाऊ स्वरूपातही वीटभट्टी मालक या मजुरांना देत असतात. वीटभट्टी व्यवसाय करण्यापूर्वी लहान व्यावसायिकांना कमीतकमी १० लाख तर मोठ्या व्यावसायिकांना ५० लाखांची रक्कम या व्यवसायात गुंतवावी लागते. व्यवसाय सुरू झाल्यावर लाल माती आणावी लागते. त्या मातीवर प्रक्रिया करण्यासाठी पाण्यात भिजत ठेवावी लागते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी मजुरांच्या हस्ते ती थापणी केल्यावर साच्यामध्ये भरून विटांना आकार दिला जातो. यानंतर, त्यांना सुकत ठेवले जाते. दोन ते अडीच महिन्यात या कच्च्या विटांना भट्टीमध्ये टाकून त्यांना पक्के केले जाते. अशा निरंतर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. सोमवारच्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात तयार कच्चा माल पूर्ण भिजल्याने वीटभट्टी मालक हवालदिल झाले.मोठा आर्थिक फटकाशासनाने वीटभट्टी मालकांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे तारा येथील वीटभट्टी मालक दिनेश पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या   वीटभट्टी वर लहान स्वरूपाच्या ३ लाख आणि मोठ्या ब्लॉक ६० हजार तयार कच्च्या विटा अवकाळी पावसात भिजून मातीमोल झाल्याचे पाटील यांनी सांगितले.अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. वीटभट्ट्याच्या झालेल्या नुकसानाही माहिती घेतली जाईल.- अमित सानप, तहसीलदार, पनवेल