शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्यालयालगत खाडीत दिसलेली मगर चार दिवसांनी लागली हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:25 IST

मच्छीमारांनी घेतला सुटकेचा श्वास

नवी मुंबई : बेलापूर येथील पालिका मुख्यालयालगतच्या खाडीत मगर दिसून आली होती. तेव्हापासून त्या ठिकाणची मच्छीमारी बंद करण्यात आली होती. या मगरीचे त्या ठिकाणावरून स्थलांतर करण्यासाठी सापळा रचला असता सोमवारी रात्री ती पिंजऱ्यात अडकली.नवी मुंबई खाडीकिनारी भागात समुद्री जीव आढळून येत आहेत.

काही वर्षांपूर्वी जुईनगर येथील नाल्यात सातत्याने मगरीचे दर्शन घडत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बेलापूर येथील पालिका मुख्यालयलगतच्या खाडीत मच्छीमारांना मगर दिसली होती. या मगरीपासून मच्छीमारांना धोका होता. यामुळे त्या ठिकाणी मच्छीमारी बंद करण्यात आली होती. या मगरीचे तिथून स्थलांतर करण्यासाठी वनविभागाच्यावतीने वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेमार्फत कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला होता.

अखेर चार दिवसांनी सोमवारी रात्री ही मगर पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याचे आढळून आले.  त्यानुसार या मगरीला त्या ठिकाणावरून सुरक्षित बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा श्वास घेतला असून त्यांची बंद झालेली मच्छीमारी सुरू करण्याचा मार्ग सुरक्षित झाला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई