शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांची हद्दपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:15 IST

गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी परिमंडळ एकने धडक मोहीम सुरू केली आहे. एका महिन्यामध्ये तब्बल १४ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, घरफोडी, मारामारीचे गंभीर गुन्हे असणाºयांचा उपद्रव शहरवासीयांना होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी परिमंडळ एकने धडक मोहीम सुरू केली आहे. एका महिन्यामध्ये तब्बल १४ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. चोरी, घरफोडी, मारामारीचे गंभीर गुन्हे असणाºयांचा उपद्रव शहरवासीयांना होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात गंभीर गुन्हे करणाºयांवर मोक्का व एमपीडीएअंतर्गतही कारवाई करण्यात येणार असून यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त म्हणून डॉ. सुधाकर पठारे यांची नियुक्ती झाल्यापासून शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आक्रमकपणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गुन्हे घडू नयेत, यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. खबºयांचे नेटवर्क सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. घडलेल्या गुन्ह्यांची तत्काळ उकल करण्यास प्राधान्य दिले जात असून न्यायालयामध्ये गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. एकापेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना तडीपार करण्याची मोहीम गतिमान करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आनंद म्हेत्रे, सुरेश पाटील, किशोर गायकवाड, सुरेश पारकर ऊर्फ फावड्या, नवनाथ अडांगळे, रूपेश जोशी व फिरोज शेख या सात जणांना तडीपार करण्यात आले होते. त्यांच्यानंतर आता शमसुद्दीन बाबू शेख ऊर्फ नदाफ, नासिर सद्दन खान, शंकर साधू बागुल, मुस्तकिन सगीर शेख, प्रथमेश शंकर नाडकर, मयूर रामदास लकडे, संजय तिवारी या सात जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पहिल्यांदाच एका महिन्यामध्ये १४ आरोपींना तडीपार करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रणामध्ये राहावे व उपद्रव करणाºयांचा वावर शहरात नसावा यामुळेच तडीपारीच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. परिमंडळ एकच्या वतीने प्रत्येक पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात आहे.वारंवार एकाच प्रकारचे गुन्हे करणारे, मारामारी व खंडणी, घरफोडी करून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाºयांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करतात; परंतु जामीन मिळाल्यानंतर पुन्हा जर ती व्यक्ती गुन्हे करत असेल तर अशांवर कडक कारवाईसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून तडीपारीला वेग आला आहे. वेळ पडली तर सराईत गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीएअंतर्गतही कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी कडक भूमिका घेण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहेत.तडीपारीची कारवाई केलेले गुन्हेगारशमसुद्दीन बाबू शेख ऊर्फ नदाफचिंचपाडा रबाळे येथे राहणाºया नदाफवर सात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये घरफोडी व मारामारीचे प्रत्येकी तीन व गर्दीचा एक गुन्हा दाखल आहे.नासिर सद्दन खानमूळचा विक्रोळी मुंबई येथे राहणारा नासिर मोटारसायकल चोर आहे. आतापर्यंत मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून ते सिद्धही झाले आहेत.शंकर साधू बागुलकोपरखैरणेमध्ये वास्तव्य असलेला बागुल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी व जबरी चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. सरकारी नोकरास दुखापत केल्याचाही गुन्हा दाखल आहे.मुस्तकिन सगीर शेखवाशीमध्ये राहणारा असणारा मुस्तकिन घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंत तीन घरफोडीचे गुन्हे सिद्ध झाले आहेत.प्रथमेश शंकर नाडकरवाकोला येथील मुख्य रहिवासी असलेला नाडकरचाही घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांत समावेश आहे. वाशी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील तीन घरफोडीचे गुन्हे केले आहे.मयूर रामदास लकडेकोपरखैरणेमध्ये राहणाºया मयूर रामदास लकडेवर खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खंडणीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.संजय राजनारायण तिवारीकाळाचौकी येथे राहणारा तिवारी चोरी व घरफोडीच्या टोळीमध्ये सक्रिय आहे. त्याच्यावर आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत.आनंद अंगद म्हेत्रेरबाळे एमआयडीसीमध्ये राहणारा आनंद रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर आतापर्यंत मारामारीचे तीन गंभीर गुन्हे दाखल असून अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल आहे.सुरेश यशवंत पाटीलदिघा येथे राहणारा सुरेश घरफोडीतील अट्टल आरोपी आहे. त्याच्यावर आतापर्यंत घरफोडीचे सात व मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे.किशोर गवºया गायकवाडखैरणे गावामध्ये राहणाºया किशोरवर अवैध सावकारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत फसवणुकीसह अवैध सावकारीचे १३ गुन्हे दाखल झाले आहेत.सुरेश पांडुरंग पारकर ऊर्फ फावड्याकोपरखैरणेमध्ये राहणारा फावड्या सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न व गर्दी मारामारीचे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.याशिवाय दुखापत करण्याचे व खंडणीचे प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत.नवनाथ एकनाथ अडांगळेकोपरखैरणेमध्ये राहणाºया अडांगळेविरोधात गर्दी व मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचत असल्याने त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.रूपेश चंद्रकांत जोशीशिरवणे परिसरात राहणाºया रूपेशविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध प्रत्येकी तीन गुन्ह्यांचा समावेश आहे.फिरोज नजिर अहमद शेखतळवली परिसरातील फिरोजविरोधात मारामारीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. सार्वजनिक शांतता धोक्यात आणली जात असल्याने त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई केली आहे.