पंकज रोडेकर - ठाणेपोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची आणि त्या संदर्भात तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची माहिती एका क्लिकवर देणारे सॉफ्टवेअर ठाणे शहर पोलिसांनी नामांकित संगणक अभियंत्याच्या मदतीने तयार करून घेतले आहे. त्यामुळे तपास अधिकारी ते पोलीस निरीक्षकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. तसेच एखाद्या गुन्ह्याची माहिती घेऊन मुख्यालयात ये - जा करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचा होणारा खर्च व वेळ वाचणार आहे. अशा प्रकारे अनोखा उपक्रम हाती घेणारे ठाणे शहर पोलीस दल हे राज्यातील पहिलेच आहे.वाढत्या शहरीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी आधुनिकेचा मार्ग अवलंबला आहे. हा अनोखा उपक्रम कर्नाटक पोलीस दलाच्या धर्तीवर हाती घेऊन राबवण्यात येणर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहर पोलीस आयुक्तालयाचा पसारा हा ठाणे शहर, वागळे इस्टेट, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर असा आहे. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचे पेपर वरिष्ठांनी मागितल्यावर आणि त्या संदर्भातील कारवाईची माहिती तपास अधिकारी घेऊन येतात तेव्हा वेळही खर्च होतो. हाच वेळ वाचावा आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी हा अनोखी उपक्रम ठाणे शहर पोलिसांनी हाती घेतला आहे. यामुळे गुन्हा दाखल झाल्या - झाल्या त्याची माहिती वरिष्ठांना आॅनलाइन पाहता येणार आहे. त्यावर तपास अधिकाऱ्याने काय कारवाई केली याचीही इत्थंभूत माहिती मिळणार आहे. तसेच यासंदर्भात तपास अधिकारी-पोलीस निरीक्षकांपासून अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळे आयडी देण्यात येणार आहेत. हा आॅनलाइन उपक्रम लवकरच सुरू होणार असून, त्याचा नियंत्रण कक्ष पोलीस मुख्यालयात राहणार आहे.दाखल होणाऱ्या गुन्ह्याची माहिती यापुढे आॅनलॉइन पाहता येईल. सध्या त्यातील बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास सुरू आहे. तसेच यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. गुन्ह्यांची माहिती घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांचा खर्च होणारा वेळ वाचणार आहे.- व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, प्रभारी पोलीस आयुक्त, ठाणे शहरदाखल गुन्हेवर्षदाखल गुन्हेउघडकीस गुन्हे टक्केवारी२०११९१४७५७०५६०%२०१२९५४१५७९७ ६१%२०१३१२०१६७००७ ५८%२०१४१२८८५६५९६ ५१%२०१५(जाने.)१२७५४३२ ३४%
एका क्लिकवर गुन्ह्यांची माहिती
By admin | Updated: March 7, 2015 01:10 IST