शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी दोषींवर होणार फौजदारी कारवाई, महापालिकेची आक्रमक भूमिका

By नामदेव मोरे | Updated: May 17, 2024 19:04 IST

  नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १५ व दुसऱ्या दिवशी ...

 

नवी मुंबई : अनधिकृत होर्डिंग्जविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी १५ व दुसऱ्या दिवशी ५ होर्डिंग्जवर कारवाई करून अनधिकृत होर्डिंग्जला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

            मुंबईमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश प्रशासनास दिले आहेत. बुधवारी सायंकाळ ते गुरुवारी सकाळपर्यंत शहरातील १५ अनधिकृत होर्डिंग्ज हटविले होते. होर्डिंग्जविरोधातील मोहीम सुरूच ठेवली असून दुसऱ्या दिवशी ५ होर्डिंग्जचे सांगाडे हटविले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. ठाणे-बेलापूर राेडवर हॉटेल रामाडा व औरम निवासी संकुल अशा दोन ठिकाणी कारवाई केली. ठाणे-बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसी अग्निशमन दलाजवळील मोठ्या आकाराचा हाेर्डिंगचा सांगाडा काढण्यात आला. तुर्भे विभागात एपीएमसी मार्केट व तुर्भे रेल्वे स्टेशनजवळील होर्डिंगही हटविले आहे.प्रत्येक विभागातील अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाणार आहे. होर्डिंगप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.

नागरिकांनी केले स्वागतनवी मुंबई महानगरपालिकेने होर्डिंग्जविरोधात सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता आहे. यामुळे सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोणत्याही दबावाला प्रशासनाने बळी पडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

अनधिकृतचा आकडा १५० वरनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २०१ होर्डिंग अधिकृत आहेत. अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण ८ विभाग कार्यालयांच्या माध्यमातून सुरू केले आहे. १५० पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निश्चित आकडा स्पष्ट होणार आहे. महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग लावलेल्या गृहनिर्माण सोसायटीवरही कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे अनेक इमारतींवरील होर्डिंग सोसायटीधारकांनी स्वत:च काढण्यास सुरुवात केली आहे.

विभाग कार्यालयांमार्फत अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले आहे. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारवाई तीव्र केली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका