शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे प्रतिबंधात्मक जनजागृती अभियान

By admin | Updated: August 3, 2015 00:08 IST

नागरी सुरक्षितता त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरी सुरक्षेअंतर्गत गुन्हे

कळंबोली : नागरी सुरक्षितता त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरी सुरक्षेअंतर्गत गुन्हे प्रतिबंधात्मक अभियान हाती घेण्यात आले असून त्यामध्ये थेट जनतेला सहभागी करून घेण्यात आले आहे. परिमंडळ-२मध्ये कामोठे वसाहतीपासून या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट रहिवाशांशी संवाद साधला.प्रभात रंजन यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर अधिक भर दिला आहे. त्यांनी नागरिक व पोलीस यांच्यातील दरी कमी करण्याकरिता समन्वय साधण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरी सुरक्षेवर जोर देत असताना गुन्हेगारांवर नागरिकांच्या सहकार्याशिवाय वचक ठेवणे कठीण असल्याचे पाहून गुन्हे प्रतिबंधात्मक जनजागृती अभियान नव्याने सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आदर्श रहिवासी सामाजिक संघाच्या सहकार्याने सेक्टर २१ मधील गुरुदेव हाईट्स या सोसाटीत बैठक झाली. पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी संवाद साधला. पुणे येथील गुन्हेगार कामोठेत येऊन राहतो, आणि खबर लागत नाही कारण पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद नाही, अशी खंत विश्वास पांढरे यांनी व्यक्त केली. आमच्याकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने काही आव्हान पेलण्यास निश्चित यंत्रणा कमी पडत असल्याचेही ते म्हणाले. आदर्श रहिवासी संघाचे अध्यक्ष वसंत गमरे, कार्यकारी सभासद रमेश म्हात्रे, उपाध्यक्ष अरविंद रावराने, देवंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)