कळंबोली : कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधाप्रकरणी पोलिसांनी ठोस भूमिका घेत खानावळ व्यवस्थापकावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती कामोठा पोलीसांनी दिली. .खानावळीचा व्यवस्थापक रवींद्र पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांनी दिली. (वार्ताहर)
खानावळ व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: March 17, 2016 01:11 IST