शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:21 IST

कोरोनाचा परिणाम; अनलॉकनंतर घडले पंधरा गुन्हे

नवी मुंबई : कोरोनामुळे रेल्वे मार्गावर घडणारी गुन्हेगारीही नियंत्रणात आली आहे. केवळ शासकीय व्यक्ती व ठरावीक वेळीच सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींना लगाम लागल्याचे दिसून येत आहे.नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर अनेक गुन्हे घडत असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे गर्दीच्या वेळीच घडतात. लोकलमध्ये असलेली गर्दी हेरून प्रवाशांचे पाकीट मारणे, मोबाइल पळवणे, याशिवाय बॅग चोरणे असे गुन्हे घडत असतात. चालू वर्षातच अवघ्या जानेवारीमध्येच १७९ तर फेब्रुवारीमध्ये १५५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, परंतु लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यानंतर रेल्वे रुळावर येऊनही गुन्हेगारांना रेल्वेत शिरकाव करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. यामुळे बऱ्याच अंशी गुन्हेगारी कृत्ये नियंत्रणात आली आहेत, तर अनलॉकनंतर पाच महिन्यांत केवळ अकरा गुन्ह्यांची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यापैकी ८ गुन्ह्यांची उकलही पोलिसांनी केलेली आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे पुन्हा सुरू होऊनही गर्दी होत नसल्याने चोरट्यांना हात मारण्याची संधीच मिळत नाहीये. यामुळे वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे.   अनेकांच्या हातावर फटका मारून हातातली बॅग पळविल्याचेही प्रकार घडले आहेत. रेल्वे प्रवासा दरम्यान घडले  आहेत.सर्वाधिक गुन्हे कुठले?नवी मुंबईत रेल्वेतून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल व बॅगचोरीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. रेल्वेतल्या गर्दीची संधी साधून चोरी केली जात असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले, त्याशिवाय बॅग पळविणे, हातावर फटका मारून हातातली वस्तू पळविणे, असेही गुन्हे घडत असतात.रेल्वेत घडलेले गुन्हे रेल्वेत असलेली प्रवाशांची गर्दीच गुन्हेगारांना संधी देत असते. अशा गर्दीत घुसलेले चोरटे प्रवाशांचे पाकीट मारतात, शिवाय हातचलाखीने मोबाइलही पळवतात.