शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कटारनवरे हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:42 IST

नवी मुंबई : अमित कटारनवरे याच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

नवी मुंबई : अमित कटारनवरे याच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. कटारनवरे याच्यावर देखील यापूर्वीचे गुन्हे दाखल असल्याने पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बारा दिवसांनंतरही त्याने पोलिसांकडे जबाब नोंदवला नसल्याने संपूर्ण प्रकरणावरच संशय व्यक्त होत आहे.नेरुळ येथे राहणाºया अमित कटारनवरे याच्यावर १२ नोव्हेंबर रोजी अज्ञात टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. कटारनवरे कार्यालयात एकटे असताना हा हल्ला झाला होता. यामध्ये त्याचे थोडक्यात प्राण बचावले असून, त्याच्यावर सध्या कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. या वेळी रुग्णालयात जाऊन पोलिसांनी कटारनवरे याचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने असहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर कटारनवरे याचे अनेकांसोबत वाद असल्याने व त्याच्यावरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्हीमधून काही संशयितांची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यावरून हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.