शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

अनधिकृत भित्तीपत्रक चिपकविणाऱ्यांवर गुन्हे

By admin | Updated: May 9, 2017 01:33 IST

अनधिकृत होर्डिंगसह भित्तीपत्रक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. सीबीडी सेक्टर ११ मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत होर्डिंगसह भित्तीपत्रक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम तीव्र केली आहे. सीबीडी सेक्टर ११ मध्ये दहापेक्षा जास्त जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून ही मोहीम नियमितपणे सुरू ठेवली जाणार आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात व शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विभाग कार्यालयाच्यावतीने कारवाईला सुरवात केली आहे. बेलापूर विभाग कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्रकाश हरिश्चंद्र बागडे यांनी पाहणी केली असता सेक्टर ११ मध्ये रेंटल फ्लॅट, सेल्स, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रिक्वायर, होमस पेंट सोल्युशन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एल. आय. सी. एजंट, जी. बी. एंटरप्रायजेस, शिपिंग आॅफशोअर, जब रिक्वायरमेंट, कर्ज मिळविणे, पी. जी. सुपर लक्झरी व इतर कंपन्यांचे भित्तीपत्रक आढळून आले. भित्तीपत्रक चिपकविण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे संबंधितांविरोधात सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच धर्तीवर नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभाग कार्यालयाच्यातवीनेही गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.