शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची भीती दाखवून लाच मागणाऱ्या तिघा पोलिसांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:29 IST

विनापरवाना सॉफ्टवेअर वापरत असल्याने कारवाईची भीती दाखवून लाच मागणाºया तिघा पोलिसांवर शनिवारी कारवाई झाली.

नवी मुंबई : विनापरवाना सॉफ्टवेअर वापरत असल्याने कारवाईची भीती दाखवून लाच मागणाºया तिघा पोलिसांवर शनिवारी कारवाई झाली. तिघेही वाशी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असून, ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस शिपाई संजय आगोने, पोलीस नाईक संतोष अवघडे व पोलीस शिपाई प्रदीप राठोड अशी तिघांची नावे आहेत.वाशीतील फिल्म एडिटिंगचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदर व्यावसायिकाकडून संगणकात वापर होणारे सॉफ्टवेअर बनावट आहे, तसेच व्यवसायाची जागा कर्मशिअल नाही असे सांगून, या तिघांकडून त्यांना कारवाईची भीती दाखवली जात होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी सदर व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती त्यांनी एक लाख रुपयांवर तडजोड केली होती.त्यानुसार सप्टेंबर महिन्यात ६० हजार रुपये स्वीकारले होते. तर उर्वरित ४० हजार रुपयांसाठी त्यांच्याकडून पुन्हा व्यावसायिकावर दबाव टाकला जात होता. त्यामुळे व्यावसायिकाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या संबंधीची तक्रार केली होती, त्यानुसार उपअधीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी सापळा रचण्यात आला होता. वाशी रेल्वेस्थानकासमोरील मार्गावर कारमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात वाशी पोलीसठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.