शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वीज कार्यालय तोडफोडप्रकरणी सहा जणांवर गुन्हे

By admin | Updated: June 2, 2017 05:46 IST

मुरु ड तालुक्यातील वीज ही २४ तासांपेक्षा जास्त तास गेल्याने संतप्त जमावाने मुरु ड शहरात असणाऱ्या वीज मंडळ कार्यालयाची

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव /मुरु ड : मुरु ड तालुक्यातील वीज ही २४ तासांपेक्षा जास्त तास गेल्याने संतप्त जमावाने मुरु ड शहरात असणाऱ्या वीज मंडळ कार्यालयाची मंगळवारी रात्री तोडफोड केली होती. त्याचबरोबर तिथे उभ्या असणाऱ्या चारचाकी गाडीच्याही सर्व काचा फोडून त्याचे नुकसान करण्यात आले होते. या नुकसानीमुळे जिल्हा पोलीस उपाधीक्षक डी.बी. निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांनी जमावातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मुरु ड पोलीस ठाण्याकडून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच काही चित्रीकरण पाहून व सत्यता पडताळून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उपाधीक्षक डी.बी. निघोट यांनी दिली.सफवान बापू फराश, नियाज नासिर अन्सारी, शोएब सन्नवर सय्यद, मोहताज जमीर जहांगीर, उमेश गजानन भोईर व कुणाल सतवडीकर अशा सहा जणांवर, तसेच पब्लिक प्रॉपर्टी अ‍ॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या सर्वांवर बेकायदा गर्दी करणे, दगडफेक करणे, सरकारी लोकांवर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे अशा स्वरूपाची कलमे लावण्यात आलेली आहेत.ज्या वीजमंडळातील लोकांनी वीज गायब करून कार्यालयात कोणतीही व्यक्ती चौकशीसाठी न ठेवता लोकांना वेठीस धरले त्या लोकांवरसुद्धा गुन्हे दाखल व्हावेत, अशी अपेक्षा मुरुडमधील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत उपअधीक्षक डी.बी. निघोट यांच्याकडे विचारणा केली असता ज्या दिवशी वीज गायब होती त्यावेळी वीज मंडळातील सर्व कर्मचारी ज्या ठिकाणी बिघाड झाला होता तिथे ते दुरुस्ती करत होते. ते आपले कर्तव्यच बजावत होते, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वीज गायब झाल्यावर लोकांनी वीज कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करून वीज मंडळ कार्यालयातील सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानेच आम्हाला सदरची कार्यवाही करणे भाग पडल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. संशयित ४० लोकांची यादी असून योग्य पडताळणी करूनच गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.