शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण प्रकरणी सहा महिन्यांत ४00 जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 02:00 IST

शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात रबाले पोलीस ठाण्यात सर्वाधिंक म्हणजेच तब्बल ५३ गुन्ह्यांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तशा आशयाचे निर्देश सर्व विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आठ विभागात मागील सहा महिन्यात अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या काळात अनेक बांधकामे पाडून टाकण्यात आली आहेत, तर काही बांधकामप्रकरणी संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अ‍ॅक्ट कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील सहा महिन्यात अशा प्रकारे जवळपास ४00 गुन्हे दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या सूत्राने दिली. रबाले पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यात ५३ बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी यास दुजोरा दिला आहे. यात घणसोलीतील ११ अनधिकृत बांधकामे आणि दोन मोबाइल टॉवर्सचा समावेश आहे. वारंवार नोटिसा बजावूनही बांधकाम सुरूच ठेवल्याने महापालिकेच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घणसोली विभाग कार्यालयाअंतर्गत एकाच दिवशी म्हणजेच २७ जून रोजी अनधिकृत बांधकाम करणारे विकासक आणि जमीन मालक अशा एकूण १३ जणांच्या विरोधात एमआरटीपी अ‍ॅक्ट कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. घणसोली अतिक्रमण विभागाचे अधिकारी रोहित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या नोटिसांना भीक न घालता बेकायदा बांधकाम सुरूच ठेवणाºया बांधकामधारकांवर एमआयटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी स्पष्ट केले आहे.