शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांवर कारवाई सुरू, फेबु्रवारीपासून २१० चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:22 IST

नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे.

नवी मुंबई : नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दोन दिवसांपासून तुर्भे उड्डाणपुलाखाली व इतर ठिकाणी क्रॅशगार्ड काढण्याची मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसात ४० वाहनांवर कारवाई केली असून शनिवारी एकाच दिवशी ३० वाहनांचे क्रॅशगार्ड काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात १७० वाहनांवर कारवाई केली आहे. वाहनधारकांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमाप्रमाणे चार चाकी वाहनांच्या समोरील बाजू फायबरची बनविण्यात आलेली असते. परंतु वाहनधारक त्या ठिकाणी क्रॅशगार्ड बसवून घेत असतात. अपघात झाल्यानंतर वाहनाचे नुकसान होऊ नये व आतमधील चालकासह प्रवाशांना दुखापत होऊ नये यासाठी क्रॅशगार्ड बसवून घेतले जात आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे पुढील बाजूला फायबर असणे आवश्यक असते. त्यामुळे अपघात झाल्यास पुढील वाहनाचे कमी नुकसान होते. याशिवाय फायबरमुळे कारमधील एअर बलून फुगण्यास मदत होते. परंतु याविषयी माहिती नसल्याने वाहनचालक क्रॅशगार्ड बसवून घेत आहेत.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारीपासून क्रॅशगार्ड असणाºया वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. शनिवारी तुर्भेमध्ये झालेल्या कारवाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी शशिकांत तिरसे, अश्विनी खोत, बजरंग कोरावले यांनी सहभाग घेतला. वाहनधारकांनी स्वत:हून क्रॅशगार्ड काढून टाकावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणाºयांवर कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून जवळपास २१० वाहनधारकांकडून दंड वसूल केला असून कारवाई सुरू राहणार आहे.- संजय डोळे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई