शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीमध्ये सुकलेल्या झाडांवर कलाकुसर

By admin | Updated: May 15, 2017 00:47 IST

वाशीमध्ये सुकलेल्या वृक्षांवर कलाकुसर करून शहर सुशोभीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. वृक्षांवरील कलाकुसर आकर्षक असली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशीमध्ये सुकलेल्या वृक्षांवर कलाकुसर करून शहर सुशोभीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. वृक्षांवरील कलाकुसर आकर्षक असली, तरी त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे. विषप्रयोग करून वृक्ष सुकविले जात असल्याचा आरोप केला जात असून, सुकलेल्या वृक्षांच्या जागेवर नवीन वृक्षलागवड करण्याची मागणी होत आहे. सिडकोने वाशी नोडचा विकास करताना रोडच्या मध्यभागी वृक्षारोपण केले होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही काही ठिकाणी नवीन वृक्ष लावण्यात आले. शहरवासीयांना प्राणवायू देणारे हे वृक्ष आता व्यावसायिकांना नकोसे झाले आहेत. यामुळे मॉल, शाळा, हॉटेल व इतर दुकानदारांनी त्यांच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्ष हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेची परवानगी घेऊन अनेक ठिकणी वृक्ष हटविले आहेत. जिथे परवानगी मिळत नाही तिथे विषप्रयोग करून वृक्ष सुकविले जात आहेत. सानपाडामधील एका शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्ष दोन वर्षांपूर्वी अशाचप्रकारे विषप्रयोग करून सुकविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या मार्गावरील सर्व वृक्ष व्यवस्थित असताना फक्त प्रवेशद्वारावरील वृक्षच कसे सुकले? असा प्रश्न दक्ष नागरिकांनी उपस्थित केला होता. वाशी सेक्टर १७, रेल्वे स्टेशनसमोरील शोरूमसमोरही अशीच स्थिती आहे. वाशीमधील दहावी-बारावी बोर्डाच्या समोरील बसस्टॉपच्या बाजूचे अनेक वृक्ष मागील वर्षभरामध्ये अचानक सुकले आहेत. सुकलेल्या वृक्षांच्या बुंध्यावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छतेकडे, स्वच्छ नवी मुंबई,असे संदेश कोरण्यात आले आहेत. वृक्षांवरील कोरीव काम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत; परंतु पर्यावरणप्रेमींनी मात्र याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. येथील वृक्ष सुकले की सुकविण्यात आले? याची चौकशी करण्यात यावी. या वृक्षांवर विषप्रयोग झाला आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. नैसर्गिकरीत्या वृक्ष सुकले असतील तर त्याच्या जागेवर किंवा बाजूला पुन्हा वृक्षलागवड करण्याची मागणी केली.