शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत चायनिजवर कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:27 IST

कोपरखैरणे परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सात चायनिज सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चायनिज सेंटरवर मद्यपींच्या पार्ट्या रंगत असून

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सात चायनिज सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चायनिज सेंटरवर मद्यपींच्या पार्ट्या रंगत असून, त्यामधून वादाचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भातच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्याने कारवाईची मोहीम हाती घेतलीआहे.शहरातील मोकळ्या जागा अनधिकृत चायनिज सेंटरने बळकावल्या आहेत. सद्यस्थितीला प्रत्येक विभागात साधारण आठ ते दहापेक्षा जास्त चायनिज सेंटर सुरू आहेत. या सर्वच ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या पार्ट्यांचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. हॉटेल अथवा बारमध्ये मद्यपान करणाºयांपेक्षा चायनिज सेंटरवर अथवा उघड्यावर मद्यपान करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चायनिज सेंटरच्या ठिकाणी, मद्यविक्री केंद्राबाहेर तसेच आडोशाच्या जागी मद्यपींचे अड्डे तयार झाले आहेत. परिणामी, पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी गतमहिन्यात उघड्यावर मद्यपान करणाºयांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत १५७ मद्यपींवर दंडात्मक कारवाई झालेली आहे. त्यांच्याकडून दंड स्वरूपात दोन लाख ६८ हजार ८०० रुपये जमा झाले आहेत. या मोहिमेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी चायनिज सेंटरवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार परिसरातील सात चायनिज सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात बालाजी चित्रपटगृह परिसरातील चायनिजचाही समावेश आहे. त्या ठिकाणी यापूर्वी सिडकोने दोनदा कारवाई करूनही हे सेंटर चालवले जात होते. त्याशिवाय इतर गर्दीच्या ठिकाणी रस्त्यालगत काही चायनिज सेंटर चालवले जायचे. यामुळे वाहतुकीला खोळंबा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होता. यामुळे चायनिज सेंटरवरच कारवाई करून उघड्यावर मद्यपान करणाºयांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका