शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापने केला भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:30 IST

पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा समितीच्या कामकाजामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे

पनवेल : पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा समितीच्या कामकाजामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. येथील पैशाचा वापर विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील यांनी २०१४ची विधानसभा व २०१७ची शिक्षक मतदार संघातील विधानसभा लढविण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी ठाकूर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पाणीपुरवठा समितीमार्फत मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीचा पैसा शेका पक्ष प्रवेशासाठी, दिवाळी भेट, मिठाईसाठी वापरण्यात आला. विधिमंडळात यासंदर्भात विषय उपस्थित केल्यानंतर २१ जानेवारी २०१८ रोजी ग्रामपंचायत अधिनियम १२९ नुसार ग्रामपंचायतीने गैरव्यवहार व अपहाराबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगत यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शेकापचे तालुका चिटणीस एकनाथ भोपी यांच्यामार्फत या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आले असून, त्यांच्याच मार्फत आमदार बाळाराम पाटील यांना निवडणुकीसाठी पैसा पुरविला असल्याचे सांगत, भोपी यांच्या बँक खात्याची तपासणीची मागणी केली आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे. भ्रष्टाचारात सरपंच व ग्रामसेवकदेखील समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा समितीमार्फत शेकाप कार्यकर्त्यांना कमी दरात पाण्याचे कनेक्शन दिले जाते. तर भाजपा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांकडून जादा दराची आकारणी करण्यात येत असल्याचे सांगितले.