शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमध्ये कचराकुंड्या उभारण्यात भ्रष्टाचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:19 IST

१८ लाख रुपये खर्च; चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी, विकासाच्या नावाखाली मनमानी

- कांता हाबळेनेरळ : नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ शहरात ४० कचराकुंड्या उभारून तब्बल १८ लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा केले आहे. या कचराकुंड्या उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा नेरळमध्ये सुरू आहे. काही जुन्याच कचराकुंड्यांची डागडुजी करून नव्याने बिल काढण्यात आले आहे. १० हजारांपेक्षा कमी खर्च येणाऱ्या का कचराकुंडीचे सुमारे ४५ हजार रुपये बिल लावण्यात आल्याने नेरळकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कचराकुंड्या उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली मनमानी सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी कचराकुं ड्यांची गरज असल्याने आणि डम्पिंग ग्राउंडची सुधारणा करण्याऐवजी कचराकुंड्या उभारण्यात १८ लाखांची उधळपट्टी केल्याने नेरळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणीसुद्धा कचराकुं ड्या उभारण्यात आल्या आहेत. काही भागात या कचराकुंड्या उभारताना विरोधदेखील करण्यात आला होता.या कचराकुंड्या पाच बाय तीन फुटांच्या तरी काही ठिकाणी कमी आकाराच्या आहेत. या कुंड्यांना लोखंडी दरवाजेदेखील लावण्यात आले नाहीत. संपूर्ण कचरा कुंडीऐवजी बाहेर पडत आहे. त्यामुळे अशा नेरळ ग्रामपंचायतीवर प्रशासनाचा वचक नसल्याने मनमानी पद्धतीने विकासकामे करून निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नेरळकरांकडून केली जात आहे.नेरळमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ४० कचराकुंड्यांची उभारणी करण्यात आली आहे. पंचायत समितीचे इंजिनीअर गुलाबराव देशमुख यांनी या कुंड्यांचे मूल्यांकन केले होते. त्यानुसार ठेकेदाराला ४० कुंड्यांचे १८ लाखांचे बिल देण्यात आले आहे.- एम.डी. गोसावी,ग्रामसेवक, नेरळ ग्रामपंचायतनेरळ ग्रामपंचायत हद्दीत ज्या कचराकुंड्या उभारल्या आहेत, त्या कुंड्यांचा मूल्यांकनाप्रमाणे दर्जा दिसत नाही. त्यामुळे ज्या कुंड्या उभारण्यात आल्या त्याचे पुन्हा मूल्यांकन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावे आणि चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करणाºयांवर कारवाई करण्यात यावी.- शिवाली पोतदार, सदस्या, नेरळ ग्रामपंचायत