शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग वसुलीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:20 IST

वैभव गायकर, पनवेल : खारघर रेल्वेस्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वाहनचालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. ...

वैभव गायकर,पनवेल : खारघर रेल्वेस्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वाहनचालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्या वसुलीतून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. घोटाळ्यात सिडकोचे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली असून, बाविस्कर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

नगरसेवक नीलेश बाविस्कर यांना गुरुवारी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी खारघर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये धाव घेतली. त्यांच्या समोरच अनधिकृत पार्किंग शुल्काची वसुली सुरू असल्याचे दिसून आले. बाविस्कर यांनी या वसुलीबाबत विचारणा केली असता त्यांना सिडकोच्या परिवहन विभागातील संतोष महाले या अधिकाऱ्याचे नाव सांगण्यात आले. तत्काळ बाविस्कर यांनी परिवहन विभागाच्या अधिकारी गीता पिल्लई यांना  माहिती दिली. त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. याठिकाणी चारचाकीवरून ११ रुपये प्रति चार तास, दुचाकीसाठी ९ रुपये १२ तास अशी आकारणी केली जाते. 

पार्किंग शुल्क वसुलीचे टेंडर संपल्यावरही कोणत्या आधारावर पार्किंग शुल्क आकाराले जात आहे. याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. एकीकडे कोविड काळात नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले असताना सिडकोच्या पे अँड पार्कच्या नावाखाली अशाप्रकारे नागरिकांच्या माथी अनधिकृतरीत्या पार्किंग शुल्क मारणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी या पार्किंगमधूनच दुचाकींची चोरी झाली. अशाप्रकारे चोरीच्या घटनांमध्ये तर येथील कर्मचाऱ्यांच्या हात नाही ना ? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होते आहे. सिडकोच्या नावाखाली असे प्रकार सुरू असतील तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :panvelपनवेल