शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेची ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम; आठही विभाग कार्यालय क्षेत्रांत सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:05 IST

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेने युनिसेफच्या वतीने ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम सुरू केली आहे. बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये मास्क असल्याशिवाय परवानगी न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.  मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. मास्कचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी  महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये  या मोहिमेचा शुभारंभ एकाच वेळी करण्यात आला. नेरूळ विभागातील शुभारंभप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्यासह युनिसेफच्या प्रतिनिधी   देविका देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेने या वेळी १ हजार मास्कचे वाटप करून मास्क कसा वापरावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयी मार्गदर्शन केले. 

शहरातील मुख्य रस्ते, मोठे होर्डिंग, वर्दळीच्या ठिकाणी लाकडी होर्डिंग, एन.एम.एम.टी. बस पॅनल, दुकानांच्या ठिकाणी पोस्टर्स तसेच ध्वनिचित्रफीत व ध्वनिक्षेपकाद्वारे याविषयी जनजागृती केली जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. मास्क नसेल तर  बस-रिक्षा-टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीमध्ये, दुकानांमध्ये  प्रवेश देऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका