शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:48 IST

३०० किलो साठा जप्त; घणसोली, ऐरोलीसह दिघामध्ये मोहीम

नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली, ऐरोली आणि दिघा विभाग कार्यालयाच्या वतीने या प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात शनिवारी मोहीम राबविण्यात आली. तीन विभागांतून एकूण तीन लाख २० हजारांची रोख दंडात्मक वसुली करण्यात आली.ऐरोली विभागात ७ पथकामार्फत केलेल्या दंडात्मक कारवाईत एक लाख २० हजार रु पये अशी रोख रक्कम वसुली करण्यात आली. तर ४३ किलो ५०० ग्रॅम प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त अनंत जाधव, उपअभियंता कल्याण कुलकर्णी, अर्जुन बिराजदार, अजय पाटील आणि स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी ऐरोली परिसरातील १५ ते २० दुकानांवर धडक कारवाई केली. दिघा विभागात एकूण १७ दुकानदारांवर कारवाई करून १५ हजार रुपये रोख अशी दंडात्मक वसुली करण्यात आली असून, दीड किलो प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघा विभागाच्या सहायक आयुक्त प्रियांका काळसेकर यांच्यासह स्वच्छता अधिकारी, उपअभियंते आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी एकूण ४ पथकांमार्फत कारवाई केली.घणसोलीत विभागात एकूण ३५ दुकानांवर कारवाई करून त्याच्याकडून एक लाख ८५ हजार रु पये रोख एवढी सर्वाधिक दंडात्मक रक्कम वसुली करण्यात आली. तर २५० किलो २०० ग्राम प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. एकूण ४ पथकांमार्फत ही धडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागाचे अधीक्षक धर्मेंद्र गायकवाड, उपअभियंता वसंत पडघन, स्वच्छता निरीक्षक विजेंद्र जाधव यांच्यासह अतिक्र मण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईला उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक धर्मेंद्र गायकवाड यांच्याकडे सायंकाळी ५.३० वाजता काही ग्राहकांच्या आलेल्या तक्रारीवरून घणसोली येथील डी-मार्ट मध्ये तपासणी केली असता त्यांच्याकडून कचºयातील अनावश्यक २०० ग्रॅम प्लॅस्टिक जप्त करून रोख ५ हजार रु पये दंडात्मक रक्कम म्हणून वसुली करण्यात आली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNavi Mumbaiनवी मुंबई