शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 00:11 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव.

पैसा, संपत्ती यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, हेच सत्य कोरोनामुळे अधोरेखित झाले. कोरोना अजूनही गेलेला नाही. परंतु मागील वर्षभरात जीवनाचे खरे मूल्य कोरोनाने शिकविले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. विशेषता हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाला याची सर्वाधिक झळ बसली. मुक्या प्राण्यांची ससेहोलपट सुरू झाली. बेवारस निराधारांवर उपासमारी ओढावली.  सुरुवातीच्या काही दिवसांतच याचे गांभीर्य माझ्या निदर्शनास आले.

त्यानुसार मी माझ्या मित्राच्या मदतीने योजना तयार केली. संकट मोठे होते. २१ मार्च रोजी दोन अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन पदपथावर उपासमारीचे जीवन जगणाऱ्यांना  खाऊ आणि पाणी वाटप केले. त्यानंतर २३ मार्च रोजी देशात ताळेबंदी घोषित करण्यात आली. त्यानुसार दरदिवशी पाचशे लोकांना रात्रीचे जेवण देण्याचे ठरले. ही बाब माझ्या आर्थिक कुवतीच्या बाहेरची होती. ताळेबंदीमुळे माझी फिटनेस अ‍ॅकेडमी ठप्प पडली होती. उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडले होते. अशा परिस्थितीत हा खर्च उचलायचा कसा, असा प्रश्न भेडसावत होता. मात्र न डगमगता जमेल तेवढे करण्याचा इरादा पक्का केला. आर्थिक मर्यादा झुगारून स्वत:ची पदरमोड करून हे काम अविरत सुरू ठेवले. गोरगरिबांना सर्वच घटकांतून मदतीचा ओघ सुरू झाला. या काळात आम्ही तब्बल २० हजार गरिबांना अन्नदान केले. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुक्या प्राण्यांचे काय, असा सवाल माझ्या मनाला शिवून केला. दुसऱ्या दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोहीम सुरू केली. ती आजही सुरू आहे. 

- अभय धोंडीराम वाघमारे फिटनेस तज्ज्ञ, नवी मुंबई(संकलन- कमलाकर कांबळे) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या