शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: एमआयडीसीमध्ये दोन कोरोना तपासणी केंद्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:51 IST

कंपन्यांमध्ये शिबिरांचे आयोजन; औद्योगिक वसाहतीसाठी पाच वैद्यकीय पथके

नवी मुंबई : नवी मुंबई : महानगरपालिकेने ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष तपासणी शिबिरे सुरू केली आहेत. या व्यतिरिक्त दोन कायमस्वरूपी तपासणी केंद्रही सुरू केली असून, औद्योगिक वसाहतीसाठी पाच वैद्यकीय पथके तैनात केली आहे.दिघा ते नेरुळपर्यंतच्या एमआयडीसीमध्ये साडेतीन हजारांपेक्षा जास्त कारखाने असून, चार लाखांपेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. शहराबाहेरून नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. एमआयडीसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिकेने प्रत्येक कंपनीमध्ये तपासणी मोहीम हाती घेतली आहे. व्यवस्थापनाने मागणी केल्यानंतर मनपाचे पथक कंपनीमध्ये जाऊन तपासणी करत आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत झायडस, लुब्रिझॉल, मिलिनियम बिझनेस पार्क, माझदा कलर्स, अमाइन्स, नेरोलॉन, अपार, पार्कर, इग्लू अशा १३ कंपन्यांमध्ये शिबिर घेण्यात आले असून, १,३३३ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने, त्यांच्या लक्षणांनुसार त्यांचे विलगीकरण केले आहे. त्यांच्या संपर्कातील २४ निकटवर्तीयांची तपासणी करण्यात आलेली आहे.एमआयडीसीमधील ठाणे, बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन (टीबीआयए) आणि टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए) यांच्या कार्यालयात तपासणी केंद्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी टीबीआयएच्या केंद्रात ६९ अँटिजेन व १० आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. टीएमआयएमधील केंद्रात ६३ जणांचे अँटिजेन व ९ जणांचे आरटीपीसीआर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्येही ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कामगारांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनपा शिबिरांचे आयोजन करत असून, दोन केंद्रे तयार केली असून, त्याचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.रेल्वे स्टेशनसह मॉलमध्येही तपासणीमहानगरपालिकेने रेल्वे स्टेशन व मॉलमधील कर्मचाºयांचीही तपासणी सुरू केली आहे. दोन्ही ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.यामुळे येथे काम करणारे सुरक्षारक्षक व इतर कर्मचाºयांना लागण होऊ नये, यासाठी मनपाच्या वतीने ही तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या