शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पालिकेच्या ‘मिशन झीरो नवी मुंबई’ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:38 IST

जनजागृतीसाठी सहा प्रचाररथ; गृहनिर्माण सोसायटीमध्ये अँटिजेन चाचणीची सुविधा

नवी मुंबई : कोरोनाबाधित व्यक्तीचा वेळेत शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही अँटिजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सहा प्रचाररथ तयार केले असून, ‘मिशन झीरो नवी मुंबई’ला सुरुवात करण्यात आली आहे.नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम सुरू केली होती. यानंतर, आता ‘मिशन झीरो नवी मुंबई’ मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाबाधित नागरिकांचा वेळेत शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यावर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत २२ ठिकाणी अँटिजेन चाचण्या केल्या जात आहेत. यापुढे गृहनिर्माण सोसायटीमध्येही या चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय खोकला, ताप, सर्दी श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. सोसयटी व वसाहतीमधील नागरिकांनी मागणी केली, तर आॅन कॉल अँटिजेन चाचणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.महानगरपालिकेच्या मिशन झीरो संकल्पनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर, झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका