शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Navi Mumbai : सहा दिवसांपासून मृतदेह ताब्यात मिळण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 01:09 IST

CoronaVirus News in Navi Mumbai : वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच विशेष परवानगी घेऊन बीड येथून आलेल्या दोन मुली प्रवास परवान्याची मुदत संपल्याने अंत्यसंस्कार न करताच रविवारी आपल्या मूळ गावी परतल्या.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारादरम्यान तुर्भे येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा हदयविकाराने मृत्यू झाला. परंतु कोरोना चाचणी अहवाल आला नसल्याचे कारण देत संबंधित विभागाने मागील सहा दिवसांपासून मृतदेहाचा ताबा नातेवाईकांना दिला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच विशेष परवानगी घेऊन बीड येथून आलेल्या दोन मुली प्रवास परवान्याची मुदत संपल्याने अंत्यसंस्कार न करताच रविवारी आपल्या मूळ गावी परतल्या.तुर्भे विभागात सेक्टर २0, २१ आणि सेक्टर २२ येथील बैठ्या चाळीत कोरानाचा चांगलाच प्रादुर्भाव वाढला आहे. १२ मे रोजी येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला पालिकेच्या वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. चाचणीनंतर तीन दिवसांनी मृतदेह ताब्यात दिले जाईल, असे रुग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईकांना सांगितले. परंतु सहा दिवस झाले तरी मृतदेह ताब्यात दिला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.याच चाळीच्या दुसऱ्या टोकाच्या रुममध्ये राहणाºया एका महिलेला श्वसनाचा त्रास होवू लागल्याने तिला तीन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. तिचा रविवारी मृत्यू झाला. तिचा अहवाल निॅगेटीव्ह आल्याने दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मात्र, मृत होवून सहा दिवस उलटले तरी कोरोना चाचणी अहवाल का आला नाही. अहवाल येण्यासाठी नक्की किती दिवस लागतात. रूग्णाचा मृत्यू झाला असताना, विशेष बाब म्हणून एक दोन दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे, असे असतानाही अहवाल येण्यासाठी इतका विलंब का याची चौकशी करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई