शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रुग्णखाटांच्या उपलब्धतेसाठी हेल्पलाइन; नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास कॉल सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:44 IST

नवी मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचारासाठी रुग्णखाटा उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. रुग्णालयात जागा मिळविण्यासाठी सुरू असलेली कसरत थांबविण्यासाठी महानगरपालिकेने हेल्पलाइन सुरू केली असून, रुग्णांच्या सुविधेसाठी मनपाचे कॉल सेंटर चोवीस तास सुरू राहणार आहे.            नवी मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचारासाठी रुग्णखाटा उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स खाटा उपलब्ध होत नाहीत. उपचारासाठी रुग्णांना दाखल करण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. २७५६७४६० हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. चोवीस तास हा नंबर सुरू राहणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कॉल सेंटरमधील डॉक्टर्स रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन त्यांना रुग्णवाहिका, रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.महानगरपालिकेने यापूर्वी रुग्णखाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती देण्यासाठी संकेतस्थळावर डॅशबोर्ड तयार केला आहे. परंतु सदर डॅशबोर्डवर माहिती अनेक रुग्णालयांकडून वेळेत अद्ययावत केली जात नव्हती. यामुळे डॅशबोर्डवर रुग्णालयांमध्ये खाटा असल्याचे दाखवले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र खाटा उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती. ही गैरसाेय दूर करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करामहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. रुग्णालयीन व्यवस्थेवरील ताण वाढत असून, नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या