शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

CoronaVirus News: सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास १०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:59 IST

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी विशेष आदेश काढून मास्कसक्ती केल्याचे जाहीर केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मागील दहा दिवसांत पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे १,५०० रुग्ण आढळले असून, ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका क्षेत्रात मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. सरकारी, खासगी कार्यालय, हॉस्पिटल, बाजारपेठ, वाहन चालविताना आणि रस्त्यावर चालताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. मास्क घातला नसल्यास यापुढे शंभर रुपयांचा दंड, तसेच कलम १८८ प्रमाणे ही कारवाई केली जाणार आहे. संबंधित कारवाई महापालिकेचे अधिकारी किंवा प्रभारी पोलीस अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल..>काहींवर दंडात्मक कारवाई : पालिकेमार्फत मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अद्यापही अनेक नागरिक बेजबाबदारपणे मास्क न लावता रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.