शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना ७५ लाखांचा विमा; महानगरपालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:32 IST

इतर विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांची तरतूद

नवी मुंबई : कोरोना योद्ध्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ५० लाख रुपये विमा कवच देण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने त्यामध्ये २५ लाखांची भर टाकून ७५ लाख रुपये विमा कवच देण्याचे निश्चित केले आहे. आरोग्यव्यतिरिक्त विभागातील कोरोनासाठी काम करणाऱ्यांसाठीही ५० लाख रुपये विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या महामारीमध्ये कर्तव्यावर हजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठीही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू होणाºया कर्मचाºयांसाठी केंद्र शासनाकडून ५० लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिकेकडूनही मदत व्हावी यासाठी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कामगार कल्याण निधीमधून २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे दुर्दैवाने एखाद्या अधिकारी व कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ७५ लाख रुपये मिळणार आहेत. ही योजना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी आहे. इतर विभागांमधील अधिकारी व कर्मचारीही कोरोनाविषयीच्या कामामध्ये सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी अद्याप शासनाची काहीही योजना नाही. महानगरपालिकेने त्यांच्यासाठी ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.प्राप्त प्रकरणाच्या छाननीसाठी विशेष समितीजे कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर आहेत. तसे संबंधित विभागप्रमुखांनी प्रमाणित केले आहे अशाच कर्मचाºयांना हे विशेष सानुग्रह अनुदान लागू असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व प्राप्त प्रकरणांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दोन, यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे उपआयुक्त हे त्या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका