शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:27 IST

प्रगतीला बसली खीळ ; नवी मुंबईतील खेळाडूंचे वर्ष गेले वाया

- योगेश पिंगळे नवी मुुंबई : कोरोनामुळे या वर्षी शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या नसून, याचा फटका क्रीडापटूंना बसला आहे. त्यामुळे त्यांच्या क्रीडा प्रगतीला खीळ बसली असून, खेळाडूंचे वर्ष वाया गेले आहे.खेळाडूंना विविध खेळांच्या माध्यमातून वाव मिळावा, कला दाखविण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळ खेळून देशाचे नाव उंचवावे. यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया या उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महापालिकेला जिल्हास्तरीय स्पर्धा खेळविण्याचा दर्जा दिला आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात २००८ सालापासून महानगर पालिका क्षेत्रात शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी विविध ५८ खेळाच्या प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये नवी मुंबई शहरातील सुमारे २१९ शाळांमधील ३० हजार खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्र्ीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधी या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. यामुळे विविध खेळांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या शालेय खेळाडूंना मोठा फटका बसला आहे.‘खेलो इंडिया’मधील संधी हुकलीशालेय खेळाडूंसाठी केंद्राकडून विविध १६ खेळ प्रकारांसाठी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. या विजेत्या स्पर्धकांची निवड करून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले जाते.नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी चार शालेय खेळाडूंची निवड झालेली आहे. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक खेळाडूंची संधी हुकली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या